जळगाव : धरणगाव पोलिसांनी अमळनेर चौफुली परिसरात नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत 40 किलोपेक्षा अधिक गांजासह एक चारचाकी जप्त केली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 20 लाख 10 हजार रुपये असून, आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला आहे.
शुक्रवारी (दि.8) रात्री 11 वाजेच्या सुमारास चोपडा रोडकडून येणाऱ्या मेटालिक सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट डिझायर (MH01 DP 0252) चारचाकीला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने वाहन न थांबवता शहराकडे वेगाने पळ काढला. यावेळी सुधीर चौधरी, सत्यवान पवार व किशोर भोई यांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग केला. पारोळा नाक्याजवळील रेल्वे बोगद्याकडे जाताना वाहनचालकाने वाहन सोडून पळ काढला.
यावेळी वाहन तपासणीदरम्यान चारचाकीमधून 40 किलो 424 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा आढळून आला आहे. या गांजाची किमत 10,10,600 रुपये आहे. वाहनासह एकूण 20,10,600 रुपयांचा मुद्देमाल पाेलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी किशोर देविदास भोई यांच्या फिर्यादीवरून संशयित वाहना चालकाविरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात एनडी
Next महाराष्ट्र
हे एक स्वायत्त, निष्पक्ष आणि जबाबदार मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
आमचे ध्येय वाचकांना ताज्या, अचूक आणि सखोल बातम्या पोहोचवणे आहे – तेही प्रामाणिक, पारदर्शक आणि निःपक्ष वृत्तांकनाच्या तत्त्वांवर आधारित.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, समाज, शिक्षण, अर्थव्यवस्था, क्रीडा, संस्कृती, आणि तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या, लेख, विश्लेषण आणि विशेष मुलाखती वाचकांपर्यंत पोहोचवतो.
Next महाराष्ट्र मध्ये प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक बातमीचे स्त्रोत सत्यापित असतात आणि संपादकीय पातळीवर तपासूनच त्या प्रसिद्ध केल्या जातात. आम्ही वाचकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी फेक न्यूज, दिशाभूल करणारी माहिती आणि भडकाऊ मजकूर टाळण्याचा कटाक्ष ठेवतो.
आमच्या टीममध्ये अनुभवी पत्रकार, रिपोर्टर्स, फोटोग्राफर्स आणि तांत्रिक तज्ज्ञ आहेत, जे डिजिटल पत्रकारितेतील नवीनतम ट्रेंड्स आणि साधनांचा वापर करून वाचकांना सर्वोत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करतात.
📌 ध्येयवाक्य: "नवा विचार, नवा प्रवाह" – बदलत्या महाराष्ट्राचा आरसा.
--------
संपर्क माहिती
ईमेल: editor@nextmaharashtra.com
फोन: +919823448544
पत्ता: [जळगाव ]
सोशल मीडिया: [Facebook, Twitter, Instagram लिंक्स]