
मुंबई : केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान वाढ लागू होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता राज्य सरकारचा महागाई भत्ताही 53 टक्क्यावरुन 55 टक्के झाला आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा फायदा कर्मचाऱी आणि पेन्शनधारक दोघांना होणार आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 असे एकूण 08 महिन्यांची डी. ए. थकबाकीची रक्कम दिली जाणार आहे.या सरकारी निर्णयासाठी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी तसेच निमसरकारी ( जिल्हा परिषद ) तसेच इतर पात्र असणारे अधिकारी, कर्मचारी व राज्य पेन्शनधारक अधिकारी, कर्मचारी लाभार्थी ठरणार आहे.
