जळगाव मनपा निवडणूक : कमळ आणि घड्याळ चिन्हाचे अधिकृत उमेदवार
जळगाव: महानगरपालिका निवडणुकीत भाजपा- शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाई महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. उमेदवारी अर्ज माघार होऊन महायुतीच्या कमळ, धनुष्यबाण व घड्याळ चिन्हावरील सर्व अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत.
प्रभाग क्र.१३ मध्ये भारतीय जनता पक्षाचे १३ अ गटातुन सपके नितीन प्रभाकर, १३ ब गटातून सौ.तायडे सुरेखा नितीन हे उमेदवार असून १३ क गटातून सौ. पाटील वैशाली अमित ह्या बिनविरोध निवड झाल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १३ ड मधून देवकर प्रफुल्ल गुलाबराव हे अधिकृत उमेदवार आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असणारे काही उमेदवार यांना पक्षाने सूचना देऊन देखील त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही. ते अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवत असून जणूकाही ते भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार आहेत अशा पद्धतीने प्रभागात प्रचार करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
तरी या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रभाग क्र.१३ मधील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की, भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी – रिपाई महायुतीचे अ, ब व ड गटातील कमळ व घड्याळ चिन्ह असणारे उमेदवार हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांनी येत्या दोन दिवसात आपल्या उमेदवारी बाबत भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्यावर पक्षातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
भूलथापांना बळी पडू नका
तरी प्रभाग क्र.१३ मधील सर्व सुजाण मतदार बंधू भगिनींनी कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्याच अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती..!
