पुणे : पावसाची दोन महिने वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा ६०% जास्त पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही गेल्या आठवडाभरात पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मराठावाडा जलमय झाला असून, दोन आठवड्यांत मराठवड्याचे चित्रच बदलले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे.
रविवारीही मराठवाड्यासह, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. सोलापुरात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिकमध्ये गोदेला आलेला पूर कायम आहे.
पावसाचा ट्रेंड यंदा बदलला?
◼️ भारतात पावसाचा ट्रेंड बदलत चालला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. १९७१ ते २०२० च्या सरासरी पावसाचा ट्रेंड पाहिला तर मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग, जळगाव, नंदुरबार या भागात कमी पाऊस होता.
◼️ यंदा १ जुन ते २६ सप्टेंबरपर्यंतचा ट्रेंड पाहिला तर या भागात जास्त पाऊस झाल्याचे स्पष्ट दिसते. देशातील अनेक भागात असेच चित्र बदल आहे.
Next महाराष्ट्र
हे एक स्वायत्त, निष्पक्ष आणि जबाबदार मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
आमचे ध्येय वाचकांना ताज्या, अचूक आणि सखोल बातम्या पोहोचवणे आहे – तेही प्रामाणिक, पारदर्शक आणि निःपक्ष वृत्तांकनाच्या तत्त्वांवर आधारित.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, समाज, शिक्षण, अर्थव्यवस्था, क्रीडा, संस्कृती, आणि तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या, लेख, विश्लेषण आणि विशेष मुलाखती वाचकांपर्यंत पोहोचवतो.
Next महाराष्ट्र मध्ये प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक बातमीचे स्त्रोत सत्यापित असतात आणि संपादकीय पातळीवर तपासूनच त्या प्रसिद्ध केल्या जातात. आम्ही वाचकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी फेक न्यूज, दिशाभूल करणारी माहिती आणि भडकाऊ मजकूर टाळण्याचा कटाक्ष ठेवतो.
आमच्या टीममध्ये अनुभवी पत्रकार, रिपोर्टर्स, फोटोग्राफर्स आणि तांत्रिक तज्ज्ञ आहेत, जे डिजिटल पत्रकारितेतील नवीनतम ट्रेंड्स आणि साधनांचा वापर करून वाचकांना सर्वोत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करतात.
📌 ध्येयवाक्य: "नवा विचार, नवा प्रवाह" – बदलत्या महाराष्ट्राचा आरसा.
--------
संपर्क माहिती
ईमेल: editor@nextmaharashtra.com
फोन: +919823448544
पत्ता: [जळगाव ]
सोशल मीडिया: [Facebook, Twitter, Instagram लिंक्स]