कॉल सेंटरवर परदेशी तरुण कामाला, ऑनलाईन फसवणुकीचा संशय
जळगाव : माजी महापौरांच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आज पोलिसांनी टाकलेल्या धाडीतून उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून सुमारे ३२ लॅपटॉप आणि ८ मोबाईलसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळावेल्या अधिक माहितीनुसार जळगावमधील ममुराबाद रोडवर माजी महापौर ललित कोल्हे यांचं फार्म हाऊस असून, या फार्म हाऊसमध्ये उघडण्यात आलेल्या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशातील लोकांशी संपर्क साधून त्यांची ऑनलाईन फसवणूक केली जात होती. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
या फार्महाऊसमध्ये बोगस कॉल सेंटर उघडण्यात आलेले होते. तसेच तिथे परराज्यातील तरुण काम करत होते. पोलिसांनी कारवाईदरम्यान, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तिथून ३२ लॅपटॉप आणि ८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ललित कोल्हे हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून, त्यांच्यावर याआधीही अनेकदा गंभीर आरोप झालेले होते.
Next महाराष्ट्र
हे एक स्वायत्त, निष्पक्ष आणि जबाबदार मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
आमचे ध्येय वाचकांना ताज्या, अचूक आणि सखोल बातम्या पोहोचवणे आहे – तेही प्रामाणिक, पारदर्शक आणि निःपक्ष वृत्तांकनाच्या तत्त्वांवर आधारित.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, समाज, शिक्षण, अर्थव्यवस्था, क्रीडा, संस्कृती, आणि तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या, लेख, विश्लेषण आणि विशेष मुलाखती वाचकांपर्यंत पोहोचवतो.
Next महाराष्ट्र मध्ये प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक बातमीचे स्त्रोत सत्यापित असतात आणि संपादकीय पातळीवर तपासूनच त्या प्रसिद्ध केल्या जातात. आम्ही वाचकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी फेक न्यूज, दिशाभूल करणारी माहिती आणि भडकाऊ मजकूर टाळण्याचा कटाक्ष ठेवतो.
आमच्या टीममध्ये अनुभवी पत्रकार, रिपोर्टर्स, फोटोग्राफर्स आणि तांत्रिक तज्ज्ञ आहेत, जे डिजिटल पत्रकारितेतील नवीनतम ट्रेंड्स आणि साधनांचा वापर करून वाचकांना सर्वोत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करतात.
📌 ध्येयवाक्य: "नवा विचार, नवा प्रवाह" – बदलत्या महाराष्ट्राचा आरसा.
--------
संपर्क माहिती
ईमेल: editor@nextmaharashtra.com
फोन: +919823448544
पत्ता: [जळगाव ]
सोशल मीडिया: [Facebook, Twitter, Instagram लिंक्स]