
धुळे: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे अनुदान जमा करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची लाच मागून 7 हजारांवर तडजोड करणारे सहाय्यक कृषी अधिकारी आणि कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर एसीबीच्या सापळ्यात अडकले. ही कारवाई सोमवारी रात्री साक्री येथे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
—
अटक झालेले आरोपी
मन्सीराम कळशीराम चौरे (45, जेबापूर रोड, पिंपळनेर, ता. साक्री) – सहाय्यक कृषी अधिकारी
रिजवान रफिक शेख (23, पोळा चौक, साक्री, जि. धुळे) – कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर
—
कारवाईचा तपशील
तक्रारदाराच्या नावावर पन्हाळीपाडा (ता. साक्री) येथे शेतजमीन असून त्या जमिनीवर शेतकरी अनुदान जमा झाले होते. त्याबदल्यात आरोपींनी 10 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणी करून सापळा रचला असता, दोन्ही आरोपींना कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
—
एसीबीचे डॅशिंग पथक
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पथकात पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, कॉन्स्टेबल मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, रेशा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींचा समावेश होता.
—

धुळे जिल्ह्यात एसीबीकडून सातत्याने धडक कारवाई सुरू असून लाचखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर सर्वसामान्य जनतेतून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
