
नियुक्ती शिक्षकांना उत्तीर्ण व्हावी लागेल tet exam
नवी दिल्ली : देशातील शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोणत्याही शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test – TET) उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे.
काल सुप्रीम कोर्टाने (suprim court) आदेशामुळे अपात्र शिक्षकांची नियुक्ती थांबणार असून, मुलांच्या मूलभूत शिक्षणाच्या अधिकाराचे रक्षण होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होईल.
सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलं आहे की, ‘शिक्षणाचा हक्क कायदा, 2009’ लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी शिल्लक आहे, त्यांनी दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. जर तसे झाले नाही, तर संबंधित शिक्षकांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल. अशा वेळी त्यांना केवळ सेवानिवृत्ती लाभ (Terminal Benefits) मिळतील; अन्य कोणताही हक्क राहणार नाही.
ज्या शिक्षकांची निवृत्ती पुढील पाच वर्षांत होणार आहे, त्यांना या नियमातून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. परंतु बढती हवी असल्यास त्यांनाही टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षक घडवण्यासाठी टीईटी आता देशातील शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
