जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीतांचा “हर घर तिरंगा” हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 14 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी सायं. 6.30 वाजता अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन जळगावतर्फे करण्यात आली असून संकल्पना नारायण बाविस्कर व हर्षल पाटील यांची आहे. दिग्दर्शन मंजुषा भिडे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन सुदीप्ता सरकार यांचे आहे. कार्यक्रमात गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणिक कुलकर्णी, भूषण गुरव, वरुण नेवे, मुकेश खैरे, डॉ. सोनाली महाजन, अंजली पाटील, रोहित बोरसे, यश महाजन व अक्षय दुसाने हे कलावंत देशभक्तीपर गीतांची मैफल सादर करणार आहेत.
कार्यक्रम निर्मिती प्रमुख अनिल कांकरिया व अमर कुकरेजा असून सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. जिल्हावासीयांनी उपस्थित राहून देशभक्तीच्या स्वरांनी मन भारावून टाकण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
—
Next महाराष्ट्र
हे एक स्वायत्त, निष्पक्ष आणि जबाबदार मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
आमचे ध्येय वाचकांना ताज्या, अचूक आणि सखोल बातम्या पोहोचवणे आहे – तेही प्रामाणिक, पारदर्शक आणि निःपक्ष वृत्तांकनाच्या तत्त्वांवर आधारित.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, समाज, शिक्षण, अर्थव्यवस्था, क्रीडा, संस्कृती, आणि तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या, लेख, विश्लेषण आणि विशेष मुलाखती वाचकांपर्यंत पोहोचवतो.
Next महाराष्ट्र मध्ये प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक बातमीचे स्त्रोत सत्यापित असतात आणि संपादकीय पातळीवर तपासूनच त्या प्रसिद्ध केल्या जातात. आम्ही वाचकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी फेक न्यूज, दिशाभूल करणारी माहिती आणि भडकाऊ मजकूर टाळण्याचा कटाक्ष ठेवतो.
आमच्या टीममध्ये अनुभवी पत्रकार, रिपोर्टर्स, फोटोग्राफर्स आणि तांत्रिक तज्ज्ञ आहेत, जे डिजिटल पत्रकारितेतील नवीनतम ट्रेंड्स आणि साधनांचा वापर करून वाचकांना सर्वोत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करतात.
📌 ध्येयवाक्य: "नवा विचार, नवा प्रवाह" – बदलत्या महाराष्ट्राचा आरसा.
--------
संपर्क माहिती
ईमेल: editor@nextmaharashtra.com
फोन: +919823448544
पत्ता: [जळगाव ]
सोशल मीडिया: [Facebook, Twitter, Instagram लिंक्स]