पुणे: पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेत केंद्र सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार पती-पत्नी अशा दोघांच्या नावे शेतजमीन असेल, तर या योजनेचा लाभ आता फक्त पत्नीलाच दिला जाणार आहे.
या योजनेंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक निधी शेतकऱ्यांना दिला जातो. तथापि, केंद्राने नियम कडक करून पत्नीलाच हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात आला आणि राज्यातील 92 लाख 91 हजार शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. मात्र, नव्या नियमामुळे सुमारे साठ हजार लाभार्थ्यांचे पैसे रोखले गेले आहेत.
कुटुंबातील एकालाच लाभ
नव्या नियमानुसार, या योजनेचा लाभ पती, पत्नी आणि त्यांची 18 वर्षांखालील मुले अशा चौघांपैकी एकालाच घेता येईल. पती-पत्नीच्या नावावर शेतजमीन असेल, तर पतीचा हप्ता बंद करून पत्नीचा सुरू ठेवला आहे. मुलगा-मुलगी यांनाही स्वतंत्र हप्ता यापुढे दिला जाणार नाही.
Next महाराष्ट्र
हे एक स्वायत्त, निष्पक्ष आणि जबाबदार मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
आमचे ध्येय वाचकांना ताज्या, अचूक आणि सखोल बातम्या पोहोचवणे आहे – तेही प्रामाणिक, पारदर्शक आणि निःपक्ष वृत्तांकनाच्या तत्त्वांवर आधारित.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, समाज, शिक्षण, अर्थव्यवस्था, क्रीडा, संस्कृती, आणि तंत्रज्ञान या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या, लेख, विश्लेषण आणि विशेष मुलाखती वाचकांपर्यंत पोहोचवतो.
Next महाराष्ट्र मध्ये प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक बातमीचे स्त्रोत सत्यापित असतात आणि संपादकीय पातळीवर तपासूनच त्या प्रसिद्ध केल्या जातात. आम्ही वाचकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी फेक न्यूज, दिशाभूल करणारी माहिती आणि भडकाऊ मजकूर टाळण्याचा कटाक्ष ठेवतो.
आमच्या टीममध्ये अनुभवी पत्रकार, रिपोर्टर्स, फोटोग्राफर्स आणि तांत्रिक तज्ज्ञ आहेत, जे डिजिटल पत्रकारितेतील नवीनतम ट्रेंड्स आणि साधनांचा वापर करून वाचकांना सर्वोत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करतात.
📌 ध्येयवाक्य: "नवा विचार, नवा प्रवाह" – बदलत्या महाराष्ट्राचा आरसा.
--------
संपर्क माहिती
ईमेल: editor@nextmaharashtra.com
फोन: +919823448544
पत्ता: [जळगाव ]
सोशल मीडिया: [Facebook, Twitter, Instagram लिंक्स]