
October weather report : हवामान विभागाने जाहीर केला ऑक्टोबर महिन्यातील अंदाज
पुणे : राज्यभरात पावसाने घातलेले थैमान हळूहळू ओसरत आहे. पूरस्थितीही आटोक्यात येत आहे.. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात हवामान कसे राहिल याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. ऑक्टोबर महिन्यात नेहमी जाणवणारे उन्हाचे चटके (October Heat) यंदा बसणार नाहीत असे आयएमडीने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यातही सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
यंदा नेहमीपेक्षा आठवडाभर आधीच दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाने आपला मुक्कामही जरा जास्तच लांबवलाय. सप्टेंबरमध्ये पावसाने आपले रौद्ररूप दाखवले असले तरी वारंवार होणारी पूर सदृश स्थिती, भूकंपाच्या घटना, अतिवृष्टी अशा कितीतरी घटना निसर्गाचं चक्र फिरल्याचीच जाणीव करून देणाऱ्या आहेत
हवामान विभागाने काय सांगितले?
भारतीय हवामान विभागाने यंदा ऑक्टोबर महिन्याचा अंदाज जाहीर केला असून नेहमीप्रमाणे जाणवणारे उष्णतेचे चटके यंदा ऑक्टोबर मध्ये राहणार नाहीत. यंदा राज्यभर ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी पावसाच्या 108% पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात या चार महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा 139% पाऊस झाला. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. एकट्या सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात सरासरीच्या 215 टक्के तर ऑगस्ट महिन्यात 169 टक्के एवढा पाऊस झाल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे.
ऑक्टोबर हिट कशामुळे निर्माण होते?
नैऋत्य मान्सूनचा परतीच्या प्रवासात आकाश हे बहुतांश निरभ्र असते. त्यामुळे तापमानात सुमारे 30 ते 35 अंश सेल्सिअस वाढ होते. ऑक्टोबर महिन्यात माती आणि जमीन ओलसर असते. दिवसा हवामान उष्ण आणि दमट असते आणि रात्री थंड असते. परतीच्या पावसामुळे तापमान वाढते आणि आर्द्रता कमी होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात उष्णतेचे चटके बसतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये सूर्यदक्षिणेकडे सरकत असतो. त्यामुळे उत्तरेकडील मैदानांवर कमी दाबाचा पट्टा कमकुवत होतो. त्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवते. परंतु यंदा संपूर्ण सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी नोंदवण्यात आल्याने ऑक्टोबर हिट चे चटके जाणवणार नसल्याचं व हवामान विभागाने सांगितलं आहे. देशभरात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 108% पाऊस झाला असून मराठवाड्यात या चार महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा 139 टक्के तर एकट्या सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 215 टक्के पाऊस पडल्याचं हवामान खात्याने सांगितलं.
